Monday, January 16, 2012

--~~0~~ मैत्रीची सदिच्छा भेट ~~0~~--


    आज अखेर तो दिवस आलाच. ज्या दिवसाची त्याला अपेक्षा नव्हती. पण तिचा आग्रहाचा आमंत्रण तो नाकारू शकत नव्हता. याच कारण कदाचित तीच त्याच्यावरच चुंबकीय आकर्षण असाव जे काही काळापासूनचिकटण्याचा" प्रयत्न करत होते पण समोरासमोर कधी चिकटले नव्हते कदाचित तिला वाटत असाव कि ते चुंबक दुसऱ्याच कशाला धडकेल आणि आपले स्वप्न कडू होतील म्हणून तिने ladies first अस्त्राचा वापर केला.
    एका शांत जागी अशांत राहण्याचा त्या दोघांचा बेत ठरला. ठरल्या वेळेअगोदर दोघेही त्या ठिकाणी आले. लांबूनच दोघांनी एकमेकांना न्याहाळले. पण समोर येऊन बोलायची हिम्मत कोणाचीच होत नव्हती. मग तांत्रिक आधार घेत mobile त्यानेच तिला call केले. अरे तुझ्या समोरच उभी आहे म्हणून समोरून उत्तर आले.
    tom n jerry सारखे मग दोघेही एकमेकांसमोर आले. काय बोलावे हे दोघांनाही सुचत नव्हते. एरवी वेळ कमी पडणाऱ्या या थापाद्यांना typing चा course सोडल्यासारखे वाटत होते. घाबरतपणा दोघांमध्ये थरथरत होता. अरे मी तुला call करत होते पण लागलाच नाही तिचे उत्तर. मी पण तुला पाहत होतो, त्याचे उत्तर.
    दोघेही मग एका झाडाखाली बसले. बसताच क्षणी ती उत्तरली " मी, लगेच निघणार आहे हा.
मम्मी ला मैत्रिणीकडे जातेय म्हणून सांगितलंय." मग मीपण खोटेपणा दाखवला " अग मला पण काम आहे, आपण लगेच निघूया." निवांत बसल्यानंतर मी तिला नेहमीप्रमाणे विचारले "कशी आहेस तू?" ती हसत म्हणाली "जशी तुझ्यासमोर आहे तशीच आहे मी." मनातल्यामनात बरी आहे असा reply देत अजून कॉमेडी नको म्हणून तो शांत राहिला तर म्हणते कशी रोज इतका बोलतो आज काय झालय तुला?
    पण त्याच्याबरोबर नेहमी असेच होते. मनाशी काय बोलायचे ते पक्के ठरवलेले असते. पण ती असल्यामुळे सर्व पाटी कोरी होते. शाळेतला गृहपाठ करूनदेखील जेव्हा सर प्रश्न विचारायचे तेव्हा नेमकीच अस व्हायायचं. कदाचित त्या सरांप्रमाणे तो तिलाही घाबरत असावा. मग तिचीच नेहमीची बडबड सुरु झाली. इकडचे तिकडचे विषय पकवत बसली आणि वरून त्याला म्हणते कशी काय आज कमी बोलतोयस. त्याच्याकडे ह्म्म्म .. शिवाय पर्याय नव्हता.
    इतक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. झाल. तिला घरून फोन आला होता. तशी तिने ओढणी सावरून निघण्याचा खोडकर इशारा त्याला दिला आणि एका क्षणात अदृश्य झाली.
    ती आली तेव्हा सर्व मिळाल्यासारख वाटत होत पण जेव्हा निघून गेली तेव्हा खूप काही राहून गेल्याच भासत होत.

Saturday, October 29, 2011

एक तरी मैत्रीण अशी असावीच,
जी आपली प्रत्येक गोष्ट हसण्यात घेणारी
आयुष्याच्या वाटेत काटे रुतल्यावर,
ती आपल्याला मलमपट्टी करणारी
मरेपर्यंत मैत्री टिकवण्याचे,
ती वचन पाळणारी
माझी प्रत्येक गोष्ट,
ती थट्टा मस्करीत घेणारी
आपले अहंकार बाजूला ठेवून,
मला समजून घेणारी
हवेशी नाते नसलेली,
जमिनीवर पाय असलेली
मैत्री आणि प्रेम यात,
राजकारण न आणणारी
दुसऱ्याबरोबर व्यस्त न होता,
क्षणाक्षणाला साथ देणारी
स्वतःला ऐश्वर्या न समजता,
ती माझा आरसा बनणारी
एक तरी मैत्रीण अशी असावीच,
जी मैत्री तोडण्याची भाषा न करणारी.

Thursday, October 20, 2011

भावना व्यक्त करायला,
उमजवावे लागते
सत्य लपवायला,
खोटे बोलावे लागते..
भांडण करायला,
कळीचा मुद्दा लागतो..
तिरस्कार करायला,
अहंकार लागतो..
वचन पाळायला,
मन लागते,
वाद मिटायला,
पिढ्या लागतात..
प्रेम कळायला,
अंतकरण लागतात..


Monday, October 17, 2011





आकर्षणालाच प्रेम जरी समजायला लागला,
एकतर्फी प्रेमाचा बंध त्याने बांधला ..

वेळ नाही दडवायची म्हणाला,
पण आयुष्य कमी पडले त्या प्रेमाला ..

Saturday, October 15, 2011

प्रेमाचा एक संदेश ..

प्रेमासाठी आणि त्या हेमासाठी आयुष्यात कधी chance मारायचा मौका नशिबात आलाच नाही,
जेव्हा मौका मिळाला तेव्हा फुकट सर्व मिळालेलं असत.
तरीपण म्हणेन, प्रेम करण सोपं असत पण ते निभावन खूपच कठीण,
कोणाचा जीवापाड विचार करायचा याची त्यालाही जाणीव होऊ द्यायची.
पण propose चा कधीच Ladies Fast नसतो,
ते पण बर असत म्हणा, उगाच पुरुष एखाद्या स्रीला नाही कसा बोलू शकतो.
जणूकाही divorce चा option available व्हावा तसा
मैत्री आणि प्रेमात खूप फरक निर्माण करण्याचा प्रयत्न होतो,
हे वयात आल्यावर कळत.
कोणाला होकार देऊन नंतर नाकारण्यापेक्षा,
गप्प राहून मैत्री टिकवणेच योग्य.
प्रेमाचा संदेश आणि संदेशचा प्रेम या शब्दांमध्ये तफावत होऊन मग,
भावनांना वाट मोकळी करायची भीती वाटते.
घाबरला, डरपोक म्हणून कुजबुज ऐकू येते,
पण हिम्मत करायची किंमत आयुष्यभर मोजावी लागते.
काहीकाळ कोणाबरोबर चालायचे,
आणि मध्येच साथ सोडायचा म्हटल्यावर मनाला काटा रुतावा अशा असह्य वेदना होतात.
काहीजण काहीवेळासाठी वाट पाहून मग,
समोरच्याला ignore करू लागतात.
आपल्यामधील मैत्री अशीच अतूट राहील सांगत,
प्रेमापेक्षा मैत्रीच श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करतात.

तुमचाच संदेश