आज अखेर
तो दिवस आलाच.
ज्या दिवसाची त्याला
अपेक्षा नव्हती. पण तिचा
आग्रहाचा आमंत्रण तो नाकारू
शकत नव्हता. याच
कारण कदाचित तीच
त्याच्यावरच चुंबकीय आकर्षण असाव
जे काही काळापासून
“चिकटण्याचा" प्रयत्न करत होते
पण समोरासमोर कधी
चिकटले नव्हते कदाचित तिला
वाटत असाव कि
ते चुंबक दुसऱ्याच
कशाला धडकेल आणि
आपले स्वप्न कडू
होतील म्हणून तिने
ladies first अस्त्राचा वापर केला.
एका शांत
जागी अशांत राहण्याचा
त्या दोघांचा बेत
ठरला. ठरल्या वेळेअगोदर
दोघेही त्या ठिकाणी
आले. लांबूनच दोघांनी
एकमेकांना न्याहाळले. पण समोर
येऊन बोलायची हिम्मत
कोणाचीच होत नव्हती.
मग तांत्रिक आधार
घेत mobileन त्यानेच
तिला call केले. अरे तुझ्या
समोरच उभी आहे
म्हणून समोरून उत्तर आले.
tom n jerry सारखे मग दोघेही
एकमेकांसमोर आले. काय
बोलावे हे दोघांनाही
सुचत नव्हते. एरवी
वेळ कमी पडणाऱ्या
या थापाद्यांना typing चा
course सोडल्यासारखे वाटत होते.
घाबरतपणा दोघांमध्ये थरथरत होता.
अरे मी तुला
call करत होते पण
लागलाच नाही तिचे
उत्तर. मी पण
तुला पाहत होतो,
त्याचे उत्तर.
दोघेही मग एका
झाडाखाली बसले. बसताच क्षणी
ती उत्तरली " मी,
लगेच निघणार आहे
हा.
मम्मी ला मैत्रिणीकडे
जातेय म्हणून सांगितलंय."
मग मीपण खोटेपणा
दाखवला " अग मला
पण काम आहे,
आपण लगेच निघूया."
निवांत बसल्यानंतर मी तिला
नेहमीप्रमाणे विचारले "कशी आहेस
तू?" ती हसत
म्हणाली "जशी तुझ्यासमोर
आहे तशीच आहे
मी." मनातल्यामनात बरी आहे
असा reply देत अजून
कॉमेडी नको म्हणून
तो शांत राहिला
तर म्हणते कशी
रोज इतका बोलतो
आज काय झालय
तुला?
पण त्याच्याबरोबर
नेहमी असेच होते.
मनाशी काय बोलायचे
ते पक्के ठरवलेले
असते. पण ती
असल्यामुळे सर्व पाटी
कोरी होते. शाळेतला
गृहपाठ करूनदेखील जेव्हा सर
प्रश्न विचारायचे तेव्हा नेमकीच
अस व्हायायचं. कदाचित
त्या सरांप्रमाणे तो
तिलाही घाबरत असावा. मग
तिचीच नेहमीची बडबड
सुरु झाली. इकडचे
तिकडचे विषय पकवत
बसली आणि वरून
त्याला म्हणते कशी काय
आज कमी बोलतोयस.
त्याच्याकडे ह्म्म्म .. शिवाय पर्याय
नव्हता.
इतक्यात तिच्या मोबाईलची
रिंग वाजली. झाल.
तिला घरून फोन
आला होता. तशी
तिने ओढणी सावरून
निघण्याचा खोडकर इशारा त्याला
दिला आणि एका
क्षणात अदृश्य झाली.
ती आली
तेव्हा सर्व मिळाल्यासारख
वाटत होत पण
जेव्हा निघून गेली तेव्हा
खूप काही राहून
गेल्याच भासत होत.