एक तरी मैत्रीण अशी असावीच,
जी आपली प्रत्येक गोष्ट हसण्यात घेणारी
आयुष्याच्या वाटेत काटे रुतल्यावर,
ती आपल्याला मलमपट्टी करणारी
मरेपर्यंत मैत्री टिकवण्याचे,
ती वचन पाळणारी
माझी प्रत्येक गोष्ट,
ती थट्टा मस्करीत घेणारी
आपले अहंकार बाजूला ठेवून,
मला समजून घेणारी
हवेशी नाते नसलेली,
जमिनीवर पाय असलेली
मैत्री आणि प्रेम यात,
राजकारण न आणणारी
दुसऱ्याबरोबर व्यस्त न होता,
क्षणाक्षणाला साथ देणारी
स्वतःला ऐश्वर्या न समजता,
ती माझा आरसा बनणारी
एक तरी मैत्रीण अशी असावीच,
जी मैत्री तोडण्याची भाषा न करणारी.
जी आपली प्रत्येक गोष्ट हसण्यात घेणारी
आयुष्याच्या वाटेत काटे रुतल्यावर,
ती आपल्याला मलमपट्टी करणारी
मरेपर्यंत मैत्री टिकवण्याचे,
ती वचन पाळणारी
माझी प्रत्येक गोष्ट,
ती थट्टा मस्करीत घेणारी
आपले अहंकार बाजूला ठेवून,
मला समजून घेणारी
हवेशी नाते नसलेली,
जमिनीवर पाय असलेली
मैत्री आणि प्रेम यात,
राजकारण न आणणारी
दुसऱ्याबरोबर व्यस्त न होता,
क्षणाक्षणाला साथ देणारी
स्वतःला ऐश्वर्या न समजता,
ती माझा आरसा बनणारी
एक तरी मैत्रीण अशी असावीच,
जी मैत्री तोडण्याची भाषा न करणारी.